विवाहितेची छेड काढत जीवे मारण्याची धमकी .


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  काेपरगाव शहरातील साई सिटी येथे राहणाऱ्या विवाहितेची छेड काढत तिच्यावर अतिप्रसंग करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या बाबासाहेब श्रीराम शिंदे (संजीवनी साखर कारखाना क्वार्टर, कोपरगाव) याच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
Loading...

साई सिटी येथे बंगल्याचे बांधकाम चालू अाहे. संबंधित महिला गुरुवारी सकाळी ८.३० वाजता या कामावर गेली होती. शिंदे याने तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. 


घाबरलेल्या महिलेने आरडाओरडा केला. महिलेचा पती येत असल्याचे पाहून शिंदे पळाला. जाताना तो म्हणाला, तू आज वाचलीस. तुला नंतर बघून घेईन. याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल डी. आर. पिकोने करत आहेत.
----------------------------
Loading...
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.