ज्यांना घराजवळचा रस्ता करता आला नाही, ते काय उड्डाणपूल करतील?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  महापौरपदाच्या कार्यकाळात कोठी ते यश पॅलेस रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला. आज हा रस्ता शहरातील सर्वात सुंदर रस्ता म्हणून ओळखला जात आहे. याच रस्त्याच्या परिसरात राहणाऱ्या मोठ्या लोकप्रतिनिधीला मात्र शहरात असे एकही मोठे काम करता आले नाही. ज्यांना आपल्या घराजवळचा रस्ता करता आला नाही, ते काय उड्डाणपूल करतील, अशी टीका आमदार संग्राम जगताप यांनी खासदार दिलीप गांधी यांचे नाव न घेता केली. 


Loading...
महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग १४ मधील उमेदवारांच्या प्रचारात ते बोलत होते. संग्राम जगताप म्हणाले, मनपाच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची राष्ट्रवादी काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. सर्व प्रभागांचा बारकाईने अभ्यास करून सक्षम व जनतेतील उमेदवार दिले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणिवपूर्वक काही गैरसमज पसरवून शहरातील वातावरण बिघडवण्याचे काम सुरू आहे. विकासाचे मुद्दे दूर गेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस मात्र विकासाच्या मुद्यावरच निवडणूक लढणार आहे.

 राज्यात असलेल्या सत्तेचा गैरवापर करत आम्हाला अडचणीत आणून खोट्या प्रकरणात आत टाकून औरंगाबादला ठेवले. प्रशासनावर मंत्र्यांचा दबाव आणून आमच्यावर कारवाई करण्यास भाग पाडले. मात्र, मी डगमगलो नाही, प्रसंगाला सामोरे गेलो. जे आम्ही भोगले, तशी वेळ उद्या तुमच्यावरही येऊ शकते. महापौरपदाच्या कार्यकाळात, तसेच आता आमदार निधीतून शहरातील सर्वच भागात विकासकामे केली आहेत. या जोरावरच राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक जिंकणार आहे. असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.
----------------------------
Loading...
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.