नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी ठेकेदाराकडून घेतले ९० हजार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांसह मीदेखील ठेकेदारीचे कामाचे कमिशन म्हणून ९० हजार रुपये घेतले, असा गौप्यस्फोट करत नगरसेविका शालिनी सुखधान यांच्या वतीने त्यांचे पती संजय सुखधान यांनी संविधान चौक नाव द्यावे या ठरावाला नगरपंचायत बैठकीत विरोध झाल्यानंतर राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. 
Loading...

नगरपंचायतीची बुधवारी मासिक बैठक होती. शहरातील मध्यवर्ती भागातील चौकाला संविधान चौक नाव द्यावे, या चौकाच्या सुशोभीकरणासाठी आम्ही स्वतः ५० लाखांचा निधी उपलब्ध करू, असा ठराव शालिनी सुखधान यांनी मांडला. या ठरावाला नगरसेवक सचिन वडागळे व्यतिरिक्त सर्वांनी विरोध केला. 


या चौकाला बबनराव कडू चौक व भास्करगिरी महाराजांच्या हस्ते दिलेले औदुंबर चौक हे नाव आहे. या चौकात कचरा साचला असून मोकाट जनावरे, वाळू, वाहने उभी असतात. या चौकाचे सुशोभीकरण करून त्याला संविधान चौक हे नाव द्यावे असे सुखधान यांचे म्हणणे होते. 


या ठरावाला मनुवादी व जातीयवादी नगरसेवकांनी विरोध केल्याचा आरोप करत सुखधान यांनी सांगितले, ज्या संविधानाच्या आधारे नगराध्यक्ष संगीता बर्डे यांच्यासह ९ नगरसेविका निवडून आल्या, त्यांनी तरी संविधानाचा आदर ठेवणे गरजेचे होते. या उद्वेगातून राजीनाम्याचे पाऊल उचलले. 


नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षासह सर्वच नगरसेवकांनी ठेकेदाराकडून मागील १९ महिन्यांत कमिशनपोटी प्रत्येकी ९० हजार रुपये घेतल्याचा गौप्यस्फोट करत सुखधान यांनी सर्वांच्याच राजीनाम्याची मागणी केली. शासनाने सर्वांवर कारवाई करून जागा रिकाम्या कराव्यात. या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे आपण जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.