वाळूच्या छाप्यात शिवसेना पदाधिकाऱ्याचा ट्रॅक्टर पकडला


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  वाळूउपशात राजकीय पक्षांचे पदाधिकारीच सहभागी असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास महसूलचे अधिकारी धजावत नाहीत. मंगळवारी सायंकाळी साकूर शिवारात टाकलेल्या छाप्यात शिवसेनेच्या उत्तर नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याचा ट्रॅक्टर पकडण्यात आला. तथापि, याप्रकरणी वाळूचोरीचा गुन्हा दाखल करण्याऐवजी महसूल अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाईचे संकेत दिले. 
Loading...

गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूउपसा सुरु अाहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांनी महसूल अधिकाऱ्यांचे वाळूतस्करांना अभय असल्याचा आरोप करत खालपासून वरपर्यंत हप्ते दिले जात असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. 


अधिकारी हे विधान किती गांभीर्याने घेतात याची उत्सुकता असताना मंगळवारी महसूलच्या पथकाने नदीपात्रात जात कारवाई केली. मंगळवारी सायंकाळी तहसीलदारांनी आपल्या पथकाला पिकअप जीपमधून कारवाईसाठी पाठवले. पथक नदीपात्रात जाईपर्यत तस्करांना सुगावा लागला नाही. 


साकूर आणि पारनेरच्या सीमेवरील नदीपात्रात पथकाच्या हाती एक ट्रॅक्टर लागला. मात्र, तेथे असलेल्या एकनाथ खेमनर याने पथकाशी वाद घालत ट्रॅक्टर नेण्यास मज्जाव केला. ही माहिती तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना मिळाल्यानंतर त्यांनी लगेच पोलिस निरीक्षकांना सोबत घेत साकूरला धाव घेत ट्रँक्टर संगमनेरमध्ये आणला. प्राथमिक चौकशीअंती हा ट्रॅक्टर खेमनर यांचाच असल्याची माहिती मिळाली असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. 


साकूरमध्ये गेल्या पंधरवाड्यात शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याचा वाढदिवस झाला. या पदाधिकाऱ्याचा सत्कार करण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे आणि तालुकाप्रमुख तालुकाप्रमुख जनार्दन आहेर उपस्थित होते. लाेखंडे आणि आहेर यांनी सत्कारादरम्यान संबंधिताच्या अंगावर मायेची शाल टाकली होती. दरम्यान, शिवसेनेचाच पदाधिकारी वाळूतस्करीत सापडल्याने पदाधिकारी आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.