महापालिका निवडणुकीत भाजपचा बंडखोरांना दम.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  महापालिका निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराविरोधात उभ्या राहिलेल्या बंडखोरांना शहर भाजपने विनंतीवजा दम दिला आहे. दोन दिवसांत या बंडखोर मंडळींनी त्यांच्या प्रभागात उभ्या असलेल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला लेखी पाठिंबा जाहीर करावा, नाही तर त्यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करण्याचाही इशारा लेखी पत्राद्वारे दिला आहे. शहर भाजपने यानिमित्ताने आठ बंडखोर मंडळी रडारवर घेतल्याचे दिसू लागले आहे. आता या सर्वांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
Loading...

मनपा निवडणुकीतील प्रभाग ४-ब मध्ये प्रिया जानवे यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवार संगीता खरमाळे यांच्याविरोधात उमेदवारी ठेवली आहे. ४-ड मध्ये पक्षाचे माजी नगरसेवक मिलिंद गंधे यांनी स्वप्निल शिंदे यांच्याविरोधात अर्ज भरला आहे. 


याशिवाय विद्यमान नगरसेविका मनीषा बारस्कर-काळे यांनी प्रभाग ६-अ मध्ये पक्षाच्या वंदना ताठे यांच्याविरुद्ध, १५-ड मध्ये प्रितेश गुगळे यांनी पक्षाच्या दत्तात्रय गाडळकरांविरुद्ध तर गायत्री चोरडिया यांनी प्रभाग १६-अ मध्ये पक्षाच्या सुनीता कांबळे यांच्याविरुद्ध, १६-ब मध्ये आशा विधाते यांनी पक्षाच्या ज्योती सातपुते यांच्याविरुद्ध, १६-क मध्ये प्रतीक बारसे यांनी पक्षाच्या गणेश सातपुते यांच्याविरुद्ध आणि पक्षाचे माजी नगरसेवक शिवाजी लोंढे यांनी १७ ड मध्ये पक्षाचे उमेदवार मनोज कोतकर यांच्याविरुद्ध उमेदवारी दाखल केली आहे. 


त्यामुळे पक्षाचे नगर शहराचे संघटन सरचिटणीस किशोर बोरा यांनी जानवे, गंधे, बारस्कर-काळे, चोरडिया, बारसे, विधाते, गुगळे व लोंढे यांना पक्ष शिस्तभंग कारवाईचा इशारा देणारी नोटिस पाठवल्याचे सांगितले जाते. 'मनपाच्या निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवारांची यादी प्रदेश भाजपच्या संमतीने घोषित करण्यात आली आहे. 


मात्र, आपण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज ठेवला आहे. तरीही दोन दिवसात त्या-त्या प्रभागातील भाजपच्या अधिकृत उमेदवाराला लेखी पत्राद्वारे पाठिंबा द्यावा. अन्यथा, पक्ष शिस्तभंगानुसार आपणावर पुढील कारवाई करण्यात येईल', असा इशारा या पत्रात देण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.