स्थायी समिती सभापती वाकळे अडचणीत.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  महापालिका निवडणुकीत भाजपच्या दृष्टीने शुवर शॉट म्हणजे निवडून येणाऱ्यांच्या यादीत पहिला क्रमांक लागणारे स्थायी समितीचे विद्यमान सभापती बाबासाहेब वाकळे सध्या अडचणीत सापडले आहे. पक्षाच्या काही मंडळीकडून त्यांच्या विरोधात प्रभागामध्ये वातावरण निर्माण करण्यात येत असल्याने त्यांची अडचण वाढली असल्याचे बोलले जात आहे. महापालिका स्थायी समितीचे सभापतीपद मिळविण्यासाठी वाकळे यांनी केलेली ऍडजेस्टमेंट आता त्यांच्या अंगलट आली आहे. 
Loading...

विशेष म्हणजे पक्षाबरोबर विरोधी शिवसेना देखील त्यांच्या अडचणीत भर घालत आहे. वाकळे हे तसे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असले तरी ते भाजप कोणा एका नेत्याचे समर्थक नाही. परंतू सावेडी उपनगरात त्यांचे प्रभावी वर्चस्व असल्याने पक्षाला त्यांना उमेदवारी देण्याशिवाय पर्याय नव्हता. महापालिकेतील स्थायी समिती सभापती केवळ आठ महिन्यांसाठी असतांनाही ते मिळविण्यासाठी वाकळे यांनी चांगलाच खटाटोप केला. 

त्यात त्यांना यश आहे. अर्थाने भाजपने उपमहापौरपदासह स्थायी समितीपद देखील न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. पक्षाचे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी केलेल्या वक्‍तव्यामुळे पक्ष अडचणी आला होता. अशावेळी महापालिकेत सत्तेची उब नको म्हणून सर्वच पदांवर भाजपने पाणी सोडले होते. अशा परिस्थितीत वाकळे यांनी स्थायी समिती सभापतीपद स्वीकारले. 

हे पद त्यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांच्या बळावर स्वीकारले होते. हे पद घेतांना त्यांनी शिवसेनेला दिलेला “शब्द’ पाळला होता. पण त्या “शब्द’ मुळे अनेकांच्या अडचणी वाढल्या होत्या. ज्याच्या अडचणी वाढल्या ती मंडळी आता वाकळे यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न करीत आहे. सभापती झाले खरे पण त्यांचा पक्षाला उपयोग झाला नाही. 

कारण पक्ष सत्तेतून बाहेर पडला होता. त्यामुळे वाकळे हे तसे शिवसेनेचे सभापती राहिले. सभापती झाल्यानंतर वाकळे यांनी आपली भूमिका देखील स्पष्ट केली होती. मी ना खा. दिलीप गांधींचा ना ऍड. अभय आगरकरांचा. मी केवळ भाजपचा असा त्यांनी पवित्रा घेतला होता. परंतू आता शिवसेना दिलेला “शब्द’ वाकळे यांची अडचण वाढवित आहे.

शिवसेनेला दिलेला “शब्द’ शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जावून तो केडगाव दिला गेला होता. त्यामुळे वाकळे यांनी पक्षाला अडचणी आणले असल्याची भावना व्यक्‍त झाली होती. आता ती मंडळी वाकळे यांना खिंडीत पकडून प्रभागात त्यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.