एटीएम गॅसकटरने फोडून १६ लाख ६४ हजार लांबवले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  राहाता लोणीतील एटीएम गॅसकटरने फोडून चोरट्यांनी १६ लाख ६४ हजारांची रोकड पळवली. ही घटना प्रवरा मेडिकल हॉस्पिटलसमोर बुधवारी पहाटे ३ वाजता घडली. पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत ते पळाले. प्रवरा ग्रामीण रुग्णालयासमोर टाटा इंडिकॅशचे तीन एटीएम आहेत. 


Loading...
यातील एक ५ ते ७ चोरट्यांनी फोडले. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तोंड वर करून रक्कम लांबवण्यात आली. लोणी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रवीण पाटील यांचे गस्तीपथक तेथून जात होते. इनोव्हा कार संशयास्पद वाटल्याने त्यांनी गाडी माघारी फिरवली. 

पोलिसांची चाहूल लागताच इनोव्हाने पलायन केले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. चोरट्यांनी प्रथम बाभळेश्वर, कोल्हारमार्गे गाडी पळवली, परंतु नगर-मनमाड रस्त्यावरील तिसगावफाट्यावरील हॉटेल ग्रीनजवळ चोरट्यांची गाडी बंद पडली. अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र उपयोग झाला नाही.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.