स्वता:ची अंत्ययात्रा काढून नगरपरिषदेचा निषेध.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करावा, या व अन्य मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासने देऊनही त्याची पूर्तता न करणाऱ्या शेवगाव नगरपरिषदेच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसचिव संजय नांगरे यांनी स्वत:चीच अंत्ययात्रा काढत अनोखे आंदोलन केले. 
Loading...

ही अंत्ययात्रा पैठण रस्त्यावरील स्मशानभुमीत आल्यानंतर नांगरे यांनी तेथे उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाहीत व लेखी आश्वासनांची पुर्तता होत नाही, तो पर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय नांगरे यांनी जाहीर केला आहे. शेवगाव नगरपरिषदेने पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करावा, शेवगाव शहरातील सर्व स्मशानभूमी व कब्रस्तानात पिण्याचे पाणी, लाइट, कंपाउंड उभारून, स्वच्छता करावी, शहरातील गटारांची स्वच्छता करावी, घाणीचे साम्राज्य त्वरीत नष्ट करावे, डास प्रतिबंधनात्मक फवारणी करुन डेंगी, मलेरिया, चिकन गुणिया सारखे आजार पसरणार नाहीत, यासाठी उपाययोजना कराव्यात, आदी मागण्या संजय नांगरे यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे वेळोवेळी केल्या होत्या. 


मात्र, त्या अद्याप पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत. 'आपल्याला लेखी आश्वासने देऊनही नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी मागण्यांची पूर्तता केली नसल्याचा आरोप संजय नांगरे यांनी केला. नगरपरिषेच्या कारभाराचा निषेध करीत नांगरे यांनी आंबेडकर चौकातून आपली स्वतःची अंत्ययात्रा काढली. ते स्वतः तिरडीवर झोपून राहिले होते. ही अंत्ययात्रा पहाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. 

----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.