कांद्याचे भाव पुन्हा कोसळले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  कांद्याचे भाव पुन्हा कोसळल्याने बाजारात विक्रीसाठी आणलेल्या कांद्याचा खर्चही निघेनासा झाला आहे. संगमनेर तालुक्यातील सिद्धु घुले या शेतकऱ्याला त्याचा अनुभव आला. घुले यांनी ६५३ किलो कांदा संगमनेर बाजार समितीत विकला. मात्र, त्याच्या हाती विक्रीचा खर्च वजा जाता केवळ ५० रूपये मिळाले.
Loading...

सिद्धु घुले हे संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील शेतकरी आहेत. त्यांच्या शेतातील कांदा त्यांनी संगमनेरला विक्रीसाठी आणला होता. त्याचा उत्पादन खर्च दूरच विक्रीसाठी आणताना झालेला खर्चही ते भागवू शकले नाहीत. संगमनेर बाजार समितीतील हरी ओम ट्रेडर्स या आडतदाराकडे २० नोव्हेंबर रोजी घुले यांनी कांदा विक्रीसाठी पाठविला होता. 


त्याचे एकूण वजन ६५३ किलो इतके भरले. त्यापैकी २२१ किलो कांद्याला प्रति किलोस २ रुपया इतका भाव मिळाला. तर त्यापैकी ४३२ किलो कांद्याला प्रति किलोस १ रुपया ११ पैसे इतका भाव मिळाला. एकूण रक्कम ९२१ रुपये ५० पैसे इतकी झाली. त्यातून हमाली ३४ रुपये ४० पैसे, तोलाई २५ रुपये, वाराई १२ रुपये तर मोटारभाडे ८०० रुपये एवढा बाजार खर्च पट्टीतून वजा करून शेतकर्‍याच्या हाती फक्त ५० रुपये १० पैसे उरले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.