सुवेंद्र गांधींची उमेदवारी पुन्हा धोक्यात !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपचे उमेदवार सुवेंद्र गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. योगेश चिपाडे यांचे अर्ज बाद ठरवले होते. त्यानंतर हे अर्ज उच्च न्यायालयाने मंजूर केले होते. याप्रकरणी हरकतदार शिवसेनेचे गिरीश जाधव व विशाल खोटे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. 

Loading...

त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही मातब्बर उमेदवार रिंगणात राहणार की जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांपैकी छाननीत भाजपचे सुवेंद्र गांधी, दीप्ती गांधी, प्रदीप परदेशी, सुरेश खरपुडे, शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. योगेश चिपाडे यांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले होते. 

निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाला संबंधित उमेदवारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर झालेल्या सुनावणीत पाच अर्ज वैध ठरवण्यात आल्याने त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला. पण उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात जाधव व खोटे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

जाधव यांनी गांधी यांच्याविरोधात तर खोटे यांनी डॉ. चिपाडे यांच्या विरोधात हरकत घेतली होती. दरम्यान, निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांपैकी अन्य काहींनीही सार्वजनिक जागांवर अितक्रमण केलेले आहे. मात्र, त्यांच्याविरोधात हरकत नोंदवण्यात आलेली नाही. याप्रकरणी शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.