भाजपाचे बंडखोर एकत्र येणार ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  निवडणुकीत भाजपचे निष्ठावान म्हणवल्या जाणाऱ्या १० जणांनी उमेदवारी दाखल केली होती. यापैकी दोनजणांनी आधीच माघार घेतली आहे. मात्र, आठजणांनी उमेदवारी अर्ज ठेवला आहे. त्यांच्यापैकी बहुतेकांना शहर भाजपने पक्ष शिस्तभंगाच्या नोटिसा बजावल्याने ही सारी मंडळी एकत्र येऊन जाहीर भूमिका मांडणार असल्याचे समजते. 
Loading...

त्यादृष्टीने काहींनी प्रयत्नही सुरू केले असून, त्याला रिंगणात उभे नसलेल्या पण पक्षनिष्ठ असलेल्यांनीही पाठबळ देण्याचे नियोजन सुरू केल्याचे सांगितले जाते. 'मंडल अध्यक्षपदाबाबत पक्षादेश पायदळी तुडवण्याची परंपरा तुम्हीच निर्माण करता व निष्ठावानांना माघार तुम्हीच घ्यायला लावता', अशी संतप्त प्रतिक्रिया नोटिस मिळालेल्यांपैकी केडगावातील एकाने व्यक्त केली. 

'मागील २५ वर्षे केडगावात आम्ही एकाकी संघर्ष करीत असताना ऐन निवडणुकीत ज्यांच्याशी आम्ही संघर्ष करून पक्ष टिकवून ठेवला, त्यांनाच तिकिटे देणे तुम्ही योग्य मानत असाल तर त्यांनी (स्थानिक पक्षश्रेष्ठी) आधी आम्हाला पक्षातून काढल्याचे जाहीरपणे सांगावे व मग आम्हीही काय सांगायचे ते जाहीरपणे सांगू, असेही त्यांनी स्पष्ट केल्याने बंडखोर, पक्ष उमेदवार व पक्षाचे स्थानिक नेते यांच्यातील सामना रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.