शाळकरी मुलीच्या मृत्यूप्रकरणी श्रीगोंद्यातील एकास अटक


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील शाळकरी मुलीच्या मृत्यूप्रकरणी सुधीर शिवाजी चोभे (वय 23, रा. लिंबी कोरेगाव, ता. श्रीगोंदा) यास बुधवारी (दि. 28) रात्री अटक करण्यात आली आहे. सदर मुलीचा खून करून तिचा मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचा संशय आहे.
Loading...

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या राळेगण थेरपाळ येथील 11 वर्षीय शालेय विद्यार्थीनीचा मृत्यू सोमवारी (दि. 26) गावातीलच एका उसाच्या शेतातील विहिरीत सापडला होता. सदर गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका संशयित युवकास ताब्यात घेतले होते. 

सखोल चौकशी केली असता त्यानेच सदर मुुलीचा खून केल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी मंगळवारी दिवसभर सदर युवकाची सखोल चौकशी केली. त्याच्याकडून मिळणार्‍या माहितीत विसंगती आढळून आली. तसेच परिस्थितीजन्य पुरावे त्याच्याविरुद्ध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्धचा संशय अधिक बळावला. 

आरोपी चोभे हा काही दिवसांपासून राळेगण थेरपाळ येथील नातेवाईकांकडे राहत होता. त्याच्या वर्तवणुकीबद्दल त्याच्या गावातील काही ग्रामस्थांच्या पूर्वीपासून तक्रारी होत्या. म्हणून तो राळेगणला नातेवाईकांकडे राहण्यास आला होता, असे सूत्रांकडून समजले. त्यानेच खून करून मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचा पोलिसांचा संशय आहे.

मयत मुलीचा मृतदेह काहीसा कुजलेला होता. त्यामुळे वैद्यकीय अधिकार्‍यांनी उत्तरीय तपासणीच्या प्राथमिक अहवालात तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत कुठलाही प्राथमिक अंदाज व्यक्त केलेला नाही. याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यात फिर्यादीचा पुरवणी जबाब नोंदवून खुनाचे कलम वाढविण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.