शिर्डी विमानतळ बाॅम्बने उडवून देण्याची धमकी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  शिर्डीतील श्री साईबाबा अांतरराष्ट्रीय विमानतळ बाॅम्बने उडवून देऊ, अशा धमकी देणारे पत्र विमानतळ अधिकाऱ्यांना एका अज्ञात व्यक्तीने पाठवल्यामुळे खळबळ उडाली अाहे. 
Loading...

याप्रकरणी राहाता (जिल्हा अहमदनगर) पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून विमानतळासभाेवतीचा बंदाेबस्त अाणखी कडक करण्यात अाला अाहे. 

राहाता पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्डी विमानतळाचे संचालक धीरेन भोसले यांना २६ नोव्हेंबर रोजी पाठवलेल्या व बुधवारी मिळालेल्या पत्रात शिर्डी विमानतळावर बाॅम्बस्फाेट घडवण्याचा इशारा देण्यात अाला अाहे.
----------------------------
Loading...
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.