अखेर श्रीपाद छिंदमसह संजीव भोर, दीपक खैरे तडीपार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  महापालिका निवडणुकीत प्रभाग ९ मध्ये उभा असलेला अपक्ष उमेदवार श्रीपाद छिंदमसह शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर, दीपक खैरे, ओंकार कराळे, भाऊसाहेब कराळे, मनोज कराळे यांना शहरातून हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने बुधवारी सायंकाळी दिले. आतापर्यंत ३०० हून अधिक जणांना शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. काहींना अटी-शर्तींवर शहरात राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. 
Loading...

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बेताल वक्तव्य करणारा छिंदम याच्याही तडीपारीचा प्रस्ताव पोलिस प्रशासनाने ठेवला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी छिंदमच्या तडीपारीचे आदेश देण्यात आले. छिंदम प्रभाग ९ मधून अपक्ष उमेदवारी करत आहे. या कारवाईमुळे छिंदमला प्रचार करणेही अवघड झाले आहे. छिंदम आता निवडणुकीला कसा सामोरे जाणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

छिंदम याच्यासह दीपक खैरे व संजीव भोर यांच्यावरही हद्दपारीची कारवाई झाली. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच भोर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई झाली. या कारवाईमुळे अनेकांना १० डिसेंबरपर्यंत शहराच्या बाहेर रहावे लागणार आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने स्वतंत्र पथकाची नियुक्ती केली आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.