विधानसभेचं उपाध्यक्षपद आ.विजय औटी यांना मिळणार ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  गेल्या 4 वर्षापासून रिक्त असलेलं विधानसभा उपाध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली आहे. हे पद शिवसेनेकडे जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली असून हे पद पारनेरचे आमदार विजय औटी यांना मिळण्याची शक्यता आहे.
Loading...

येत्या 30 तारखेला विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. विधानसभा उपाध्यक्ष पदावर शिवसेनेनं दावा केला होता, पण भाजपनं हे पद रिक्त ठेवलं होतं. आगामी लोकसभा निवडणुका आणि मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हे पद भरलं जात आहे.

नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. त्यामध्ये भाजपचे हरिभाऊ बागडे विजयी झाले. उपाध्यक्षपद मात्र रिक्तच होते. आता या पदासाठी निवडणूक होणार आहे. शिवसेनेकडून या पदासाठी औटी यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. औटी सलग तीन वेळा पारनेर विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले आहेत.

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी औटी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यानंतर समझोता झाल्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतल्याने बागडे यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे आता उपाध्यक्षपदासाठी औटी हे प्रबळ दावेदार आहेत.

काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात मराठा आरक्षणासंदर्भात बैठक पार पडली. त्यानंतर लगेच निवडणूक जाहीर झाल्याने या बैठकीत या पदाबाबत चर्चा करण्यात आल्याचंही बोललं जात आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.