'त्या' 32 विद्यमान नगरसेवकांना दाखविला घरचा रस्ता !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिकेच्या निवडणूक रिंगणात 41 विद्यमान नगरसेवक पुन्हा एकदा नशीब अजमावत आहेत. तर तब्बल 32 नगरसेवकांनी घरचा रस्ता दाखवला आहे. तर काही विद्यमान नगरसेवकांनी आपल्या सौभावतींना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. तर काही प्रभागात विद्यमान नगरसेवक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहे.
Loading...

विद्यमान नगरसेवकांपैकी माजी महापौर अभिषेक कळमकर, उपमहापौर अनिल बोरूडे, माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर, विपूल शेटीया हे दिग्गज निवडणुकीच्या मैदानातून बाहेर पडले आहेत. अनिल बोरूडे, संजय शेंडगे यांनी आपल्या सौभावतींना उभे केले आहे. 


गेल्यावेळी एक पक्ष होता अन्‌ आता दुसरा पक्षाच्या माध्यमातून अनेक नगरसेवक निवडणुकीला उभे राहिले आहेत. त्यात सागर बोरूडे, दिपाली बारस्कर, शारदा ढवण, स्वप्नील शिंदे, मुदस्सर शेख, वीणा बोज्जा, मनोज दुलम, कलावती शेळके, सारिका भुतकर, किशोर डागवाले, बाळासाहेब बोराटे, सुनील कोतकर, सुनीता कांबळे, सुवर्णा जाधव, गणेश भोसले हे आता नव्या चिन्हावर निवडणुकीला समोरे जात आहेत.

या निवडणुकीत किशोर डागवाले व उमेश कवडे तर अरिफ शेख व मुदस्सर शेख या दोन विद्यमान नगरसेवकांमध्ये समोरासमोर लढत होत आहे. त्यामुळे या लढती चुरशीच्या होणार आहेत. 32 विद्यमान नगरसेवकांना आरक्षणासह पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने तसेच काहींनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. अशी कारणे असली तरी बहुतांशी विद्यमान नगरसेवकांना यावेळी आरक्षण व उमेदवारी डावलण्यात आल्याने घरचा रस्ता पकडावा लागला आहे.


सध्या तरी सागर बोरूडे, दिपाली बारस्कर, शारदा ढवण, संपत बारस्कर, महेश तवले, उषा नलवडे, रूपाली वारे, योगिराज गाडे, इंदरकौर गंभीर, स्वप्नील शिंदे, समद खान, मनोज दुलम, कलावती शेळके, वीणा बोज्जा, दीप चव्हाण, अरिफ शेख, मुदस्सर शेख, नंदा साठे, सुवेंद्र गांधी, संजय घुले, बाळासाहेब बोराटे, सुरेखा कदम, दत्तात्रय कावरे, सारिका भुतकर, कुमार वाकळे, बाबासाहेब वाकळे, मालन ढोणे, अनिला राठोड, श्रीपाद छिंदम, किशोर डागवाले, उमेश कवडे, शितल जगताप, गणेश भोसले, विजय गव्हाळे, सुवर्णा जाधव, आशा पवार, विद्या खैरे, अनिल शिंदे, सुनील कोतकर, सुनीता कांबळे व दिलीप सातपुते हे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले असून आपले नशीब अजमावत आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.