रावसाहेब दानवे यांच्याकडून आचारसंहिता भंग.

                   

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- निवडणुकीत कोणाही उमेदवाराने,पक्षाने किवा नेते अथवा कार्यकत्यांनी कोणत्याही गैर मार्गाचा अवलंब करू नये अन्यथा आपण संबंधिता विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करणार असे निर्देशित केले आहे. तथापि, काही राजकीय पक्ष व नेतेमंडळी सर्रास आचारसंहिता भंग करत असल्याची तक्रार केतन गुंदेचा यांनी आचासंहिता कक्षाकडे निवदेनाद्वारे केली. 
Loading...

निवेदनात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाच्या रविवारी झालेल्या सभेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आचारसंहिता काळात नगरकरांना मतदान करण्याचे आवाहन करताना आमिष दाखवले. जर नगरच्या जनतेने भारतीय जनता पार्टीच्या हातात सत्ता दिली तर नगरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी भाजप सरकार ३०० कोटी रुपयांचा निधी देईल असे त्यांनी जाहीर केले. 

विधान सभेचे अधिवेशन सुरु असतांना आणि नगर महानगरपालिकेची नगरसेवक पदासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरु असताना अशा प्रकारे नगरकरांना सरकारी योजनेचे व भरीव निधीचे आमिष व याची घोषणा करणे हा आचार संहिता भंग होत नाही का? माझ्या या तक्रारची तत्काळ दखल घेउन गुन्हा दाखल करावा अशी मागणीही गुंदेचा यांनी निवडणूक कक्षाकडे केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.