दुकानात शिरला चक्क साडेपाच फूट लांबीचा अजगर !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी शहरातील एका भांड्याच्या दुकानात चक्क साडेपाच फूट लांबीचा अजगर मंगळवारी शिरला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. गजबजलेल्या भागात अजगर आलाच कसा, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मध्यवस्ती असलेल्या शिवाजी चौकात सुहास कोळपकर यांच्या 'कोळपकर बंधू' या भांड्याच्या दुकानात अडगळीच्या ठिकाणी हा अजगर होता. 
Loading...

दुकानाचे मालक सुहास कोळपकर यांना अजगर दिसताच त्यांनी आरडाओरडा केला. काय झाले, म्हणून आजूबाजूचे व्यापारी व रस्त्यावरील लोक या दुकानाकडे धावले. सर्पमित्र कृष्णा पोपळघट, धनंजय बुऱ्हाडे, अभिजित दायमा यांनी या अजगरास शिताफीने पकडले. हा अजगर दीड ते दोन वर्षांचा असून साडेपाच फूट लांब आहे. या भागात चोवीस तास माणसे व वाहनांची वर्दळ सुरू असते. 

कापड, सोने-चांदी, भांडी आदींची दुुकाने या भागात असून नागरी वस्ती आजूबाजूला असताना हा अजगर आला कसा, याची जोरदार चर्चा आहे. काही वेळा नाग, धामीण आढळतात, पण अजगर दुकानात आढळल्याचे कधी ऐकिवात नाही. वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना पाचारण करण्यात आले. अजगरास वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले असून त्याला जंगलात सोडण्यात येणार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.