नगर-औरंगाबाद महामार्गावर एसटी-ट्रक अपघातात २५ प्रवासी जखमी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-औरंगाबाद महामार्गावर देवगडफाटा-खडकेफाटादरम्यान हॉटेल दीपज्योतसमोर मेहकर-पुणे एसटी बस व उसाच्या भुशाच्या ट्रकची धडक होऊन मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास झालेल्या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले. जखमी झालेल्या तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. दोन प्रवाशांना नगरला, तर एकाला औरंगाबादला हलवण्यात आले आहे. 
Loading...

मेहकर आगाराची एसटी बस (एमएच ४० वाय ५३४६) पुण्याच्या दिशेने जात होती. बसमध्ये ४६ प्रवासी होते. साखर कारखान्याचा भुसा वाहणारी ट्रक (एमएच १६ बीसी ६५६६) बोधेगावहून औरंगाबादकडे जात होती. हॉटेल दीपज्योतकडे वळत असताना ट्रकच्या डावीकडील मागील बाजूस बसची धडक बसली. त्यामुळे बसचा पुढील भागाचा चक्काचूर झाला. 

जखमींपैकी मारुती शेकरे(६५, हातगाव) व भगवान भुतेकर (७०, पळसखेड) यांना पुढील उपचारासाठी नगर येथे, तर फातिमा शेख (४५, औरंगाबाद) यांना औरंगाबादला पाठवले. सीताराम पवार (७२, हातगाव), सुनंदा मोहन चव्हाण(४५, सेलू),नारायण शिंदे, दगडाई टापरे, सुलोचना काळे, मंदा अशोक चांगोडे (४०, कलबेश्वर), सावित्रीबाई भगवान भुतेकर(६०, पळसखेड), प्रकाश भीमराव शिंदे(३२, हातळी), शशिकला नलगे (६०, शिरोडा), कावेरी बोंदरे, विकास बबन सुर्वे (२४, पुणे), त्रिंबक बडे (७२, जाटवड), प्रल्हाद टापरे (६५, परांडा), पद्मावत उदळकर (६५, मेहकर), अशोक चांगोडे (५०, कलबेश्वर), संजय दिगंबर जोशी (५२, मेहकर), मुक्ता शिंदे (परतूर) हे ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.