आगामी काळात कॉंग्रेसला पुन्हा वैभवशाली दिवस येणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  कॉंग्रेसला त्यागाची व बलिदानाची मोठी परंपरा लाभली आहे. खा. राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या शक्ती ऍपमुळे युवकांचा थेट पक्षाध्यक्षांशी संवाद साधता येणार आहे. कॉंग्रेसचा विचार हा सर्वांना पुढे घेऊन जात देशाच्या प्रगतीसाठी आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. 


Loading...
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह. साखर कारखाना कार्यस्थळ येथे संगमनेर तालुका विद्यार्थी कॉंग्रेस संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार व शक्ती ऍपचे लोकार्पण आ. थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी आ. थोरात यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आली. आ. थोरात म्हणाले, कॉंग्रेस पक्ष देशाच्या प्रगतीचा विचार करणारा पक्ष आहे. सर्वधर्मसमभाव व एकात्मता हीच कॉंग्रेसजनांची ओळख आहे. पक्षाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात कॉंग्रेसला पुन्हा वैभवशाली दिवस येणार आहेत. अल्पसंख्याक सेल हा सर्वसामान्यांना प्रतिनिधित्व देणारा आहे. 


या सेलच्या माध्यमातून उपेक्षित वर्गासाठी मोठे काम कारण्यास वाव आहे. भाजपाच्या भूलथापांना आता लोक कंटाळले आहेत. देशातील जनतेला भाजपचे खरे रूप समजले आहे. युवा पिढीही भाजपाच्या विरोधात आहे. आपले काम प्रामाणिक करा. विचारांशी एकनिष्ठ रहा, तुम्हाला पक्षात चांगले मानाचे स्थान राहिल असेही ते म्हणाले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.