एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर युवकाचा चाकूने हल्ला


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीवर युवकाने चाकूने हल्ला करीत तब्बल १८ वार केले. यानंतर त्याने विष घेऊन स्वतःचे जीवन संपवण्याचाही प्रयत्न केला. मुलीची परस्थिती सध्या गंभीर असून तिला उपचारासाठी नागपूर इथं हलवण्यात आलं आहे.


Loading...
चिमूर तालुक्यातील नंदारा गावातील आरोपी केतन सुरेश गजभे (वय २२) याचं गावातील एका मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. मात्र, ती काही प्रतिसाद देत नाही म्हणून त्यानं तिला जाब विचारण्याचा प्रयत्न केला.मुलगी आपल्या वर्गमैत्रिणीसह शाळेत जात होती. यावेळी आरोपी केतन गजभेनं तिचा रस्ता अडवला. त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

यादरम्यान, केतनने सोबत आणलेल्या चाकूने मुलीवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. या क्रूर हल्ल्यात मुलीवर तब्बल १८ वार केले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली.तर आरोपीने घटनास्थळापासून पळ काढला आणि काही अंतरावर जाऊन उंदीर मारण्याचे औषध घेतले. त्याला चिमुरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.जखमी मुलगी आणि तिच्यावर हल्ला करुन विष विष प्राशन करणारा युवक दोघांची प्रकृती गंभीर आहे. मुलीला पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आलं आहे.
----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.