सत्तेसाठी दानवे नगरकरांना तीनशे कोटीचे गाजर दाखवून गेले !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  रावसाहेब दानवे म्हणाले की नगरला पाणी आम्ही पाजू अरे तुम्हाला पाणी नगर जिल्हा पाजतो तुम्ही काय आम्हाला पाणी पाजणार. या दानवेला त्याच्या भागात चकवा म्हणतात. म्हणून ते नगर शहराला चकवा देण्यासाठी आले. आणि सत्तेसाठी दानवे नगरकरांना तीनशे कोटीचे गाजर दाखवून गेले, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले. 
Loading...

प्रभाग क्र.5 मधील प्रोफेसर कॉलनी चौक येथे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार पराग गुंड पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अधिकृत उमेदवार वीणा बोज्जा, कलावती शेळके, जयंत येलूलकर, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार,युवासेना जिल्हाअध्यक्ष विक्रम राठोड संदीप कुलकर्णी उपस्थित होते.

राठोड पुढे म्हणाले निवडणूकी मध्ये संपर्क कार्यालय हे महत्वाचे. त्यातूनच सर्व नियोजन केले जाते. या प्रभागात काही दिवसांपूर्वी असे चित्र होते की हे जे पॅनल आहे ते काय करणार. पण या दोन-चार दिवसात वातावरण बदलले आणि आता सर्वात ताकदवान पॅनल शिवसेनेचे झाले आहे. 

भाजपवाले काहीही बोलले जनतेला चकवा देण्यासाठी तीनशे-चारशे कोटी आणू हे खोटे आहे हे जनतेच्या लक्षात आलेले आहे.हा गाजर दाखवतो.आता पर्यंत यांचे हात धरले होते का 100 कोटी तरी आणायचे ना.आणि म्हणून यांच्या नुसत्या गप्पा आहेत.शिवसेना खोटे बोलत नाही म्हणून नगरकरांचा विश्वास हा शिवसेनेवर आहे. म्हणून आम्ही महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी तत्पर आहे,असे सांगितले.
----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.