विनापरवाना खोदकामप्रकरणी रिलायन्सला 50 लाखांचा दंड.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  नगर तालुक्‍यातील बुऱ्हाणनगर, नागरदेवळे, जेऊर, वारुळवाडी, कापूरवाडीसह इतर ग्रामपंचायत हद्दीत रिलायन्स कंपनीमार्फत रस्त्यांतर्गत ग्रामपंचायतीची परवानगी न घेता रस्ते खोदाई सुरु होती. 


Loading...
याबाबत पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र विधानमंडळात तारांकित प्रश्‍न झाल्यानंतर रिलायन्स कंपनीने तालुक्‍यातील विविध ग्रामपंचायतीमध्ये 50 लाख रुपये जमा केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव यांनी दिली. 

याबाबत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा सदस्य आमदार अनिल बाबर यांनी याबाबत तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. यामध्ये नगर जिल्ह्यात रिलायन्स जिओ कंपनीच्या वतीने अनाधिकृतपणे केबल टाकून लाखो रुपयांच्या महसुलाची चोरी होत असल्याबाबत प्रश्‍न होता. 


याबाबत ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देऊन रिलायन्स जिओ कंपनीने नगर तालुक्‍यातील विविध ग्रामपंचायतींच्या तसेच जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता तसेच शासनाचा महसूल कर न भरता रस्ते खोदकाम करुन मोठ्या प्रमाणात केबल टाकण्याचे काम केले होते. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.