भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस ७ डिसेंबर रोजी नगर मध्ये येणार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  महापालिका निवडणुकीसाठी भाजपने रविवारी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते प्रचाराचे नारळ वाढवून प्रारंभ केल्यानंतर प्रचाराने वेग घेतला असून, सर्वच प्रभागांतील उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसत आहेत. 
Loading...

दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात भाजपच्या 'स्टार प्रचारकां'च्या प्रचारसभा होणार असून, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री राम शिंदे यांच्या सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 


महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला धडाक्यात सुरुवात करणाऱ्या भाजपाने प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यातही प्रचाराचे चोख नियोजन केले आहे. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील 'स्टार प्रचारकां'च्या प्रचारसभा आणि रोड शोजच्या माध्यमातून शहरातील वातावरण भाजपमय करण्याची रणनिती आखण्यात आली आहे.


केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंधारण मंत्री राम शिंदे यासारखे दिग्गज नेते महापालिकेच्या प्रचार मोहिमेत सहभागी होणार आहेत. ७ डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभांनी प्रचाराची सांगता होणार आहे. 


या प्रचाराच्या रणनितीमुळे भाजपच्या प्रचाराला निर्णायक कलाटणी मिळणार असल्याचे मानले जात आहे. नगर महानगरपालिका निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात भाजपने दिग्गज मंत्र्यांच्या प्रचार सभांचे नियोजन केले आहे. येत्या ९ डिसेंबरला मतदान होणार असल्याने तोपर्यंत भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते प्रचारात सहभागी हाेणार आहेत. 


परिणामी भाजपच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह संचारला आहे. त्यातच प्रचाराची सांगता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांनी होणार असल्याने ते काय बोलतात याकडे नगरकरांचे तसेच विरोधकांचेही लक्ष लागून राहिले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.