सर्व धर्म समभावाची शिकवण देणार्या साईमंदिराचे भगवीकरण


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  साईबाबांनी संपूर्ण जगाला एकात्मतेसाठी 'सबका मलिक एक' हा संदेश देवून सर्व धर्म समभावाची शिकवण दिली. मात्र, अलिकडच्या दोन वर्षांपासून विद्यमान विश्वस्तांनी साईबाबांच्या काळापासून सुरू असलेल्या रूढी परंपरेस पायदळी तुडवत साईमंदिराचे भगवीकरण सुरू केले आहे.


Loading...
मंदिरातील भगवे बोर्ड हटवून पूर्वीप्रमाणेच लावावेत व सर्वधर्मियांचे प्रतिक असलेल्या द्वारकामाई मंदिराच्या प्रवेशद्वारावर पूर्वीप्रमाणेच द्वारकामाई -मज्जीद बोर्ड लावावा, अशी मागणी शिर्डी ग्रामस्थांनी संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, सर्वधर्मिय ग्रामस्थांनी साईबाबा संस्थानला निवेदन देताच साईबाबा संस्थान प्रशासनाने द्वारकामाई मंदिराच्या भिंतीवर लावलेला द्वारकामाई मंदिर हा फलक तातडीने काढून टाकला आहे. 


ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २००४ साली राज्य सरकारने साईबाबा संस्थान ताब्यात घेतल्यानंतर एक नियमावली तयार करुन या नियमावलीस घटनात्मक दर्जा दिला. या नियमावलीचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश राज्य सरकारने विश्वस्त व प्रशासनाला दिले आहे. या नियमावलीत साईबाबांची शिकवणूक, आदर्श, संदेश यांचे पालन करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे अधोरेखीत करण्यात आले आहे. 


२००४ ते २००१६ पयंर्त तत्कालीन साईसंस्थानच्या विश्वस्तांनी व प्रशासकीय समितीने साईबाबांच्या विचाराला व संदेशाला तडा जाणार नाही याची काळजी घेतली. मात्र, २०१६ पासून राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विश्वस्तांकडून राज्य सरकारने साईसंस्थानसाठी दिलेल्या नियमावलीचे सातत्याने उल्लंघन होत आहे. 


गेल्या दोन वर्षांपासून साईमंदिर व परिसरातील पूर्वीचे दिशादर्शक व माहितीचे सर्व फलक हटवून भगव्या रंगाचे फलक लावण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमज निर्माण होत आहे. समाधी शताब्दी वर्षात महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते साईबाबांच्या लेंडीबागेत स्तंभाची उभारणी केली. या स्तंभावर सर्व धर्माची प्रतिके असायला हवी होती. मात्र, आपण फक्त विशिष्ट एका धर्माचे प्रतिक तेथे लागले आहे. 


यामुळे साईभक्तांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. तसेच साईसत्चरित्र व साईिलला मानसिकता मुखपृष्ठावर सबका मलिक एक हा संदेश गायब झाला आहे. तेथे सबका मलिक एक ऐवजी ओम साईनाथाय नम: असा नवीन संदेश आला आहे. याबाबत शिर्डीतील सर्व जाती धर्मियांंच्या वतीने आपणास विनंती आहे की, साईबाबांचे महात्म्य, रूढी परंपरा, संदेश यांना कोणत्याही प्रकारे तडा दिला जावू नये.

विश्वस्त जर चुकीचे निर्णय घेत असतील तर राज्य सरकारने प्रतिनिधी म्हणून व कार्यकारी अधिकारी या नात्याने अलिकडच्या काळाच्या मंदिर व मंदिर परिसर, हॉस्पिटल, शैक्षणिक संकुल, धर्मशाळा येथील दिशादर्शक बोर्ड व माहितीचे बोर्ड पूर्वीच्या रंगातील करावे व द्वारकामाई मंदिर या ऐवजी पूर्वीप्रमाणेच द्वारकामाई मज्जीद असा बोर्ड लावावा. 


येत्या आठ दिवसांत प्रशासनाच्या वतीने वरील प्रमाणे बदल करून देश व विदेशातील करोडों साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांच्या भावनेचा विचार करून कार्यवाही करावी; अन्यथा शिर्डी ग्रामस्थ, साईभक्त एकत्रितपणे आंदोलनाच्या माध्यमातून कार्यवाही करतील, असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे. .

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.