पती-पत्नीला गजाने मारहाण करून विनयभंग


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  संगमनेर तालुक्यातील डोळासणे येथे पती-पत्नीला घरात घुसून लाथाबुक्यांनी व लोखंडी गजाने मारहाण करत महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना शनिवार दि. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.


Loading...
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पांडुरंग भाऊ काकड याचे कुत्रे भुंकत असल्याने त्यामुळे ती व्यक्ती काकड याला सांगण्यासाठी गेली. त्यावेळी काकड याला राग अनावर झाल्याने त्याने त्या व्यक्तीच्या घरात घुसून त्यांना गजाने मारहाण केली. महिलेस मारहाण करत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. आणि 'पुन्हा माझ्या नादी लागाल, तर तुम्हाला जीवे मारुन टाकीन', अशी धमकी दिली.

मारहाणीत पती-पत्नी जखमी झाले आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी काकड याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १७६/२०१८ नुसार भा.दं.वि. कलम ३२३, ४५२, ३५४, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले करत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.