कापूस चोरणाऱ्या टोळ्यांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कापसाच्या चोऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे कापूस उत्पादकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. नेवासे तालुका ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तथापि, पाण्याची पातळी जसजशी कमी होत आहे, तसतसे शेतकरी नगदी पीक म्हणून कांदा आणि कपाशीकडे वळाले आहेत. 


Loading...
यावर्षी कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली. शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून जीव लावून कपाशीचे पीक जगवले. आता वेचणीची म्हणजे फळ मिळण्याची वेळ आली असता शासनाने अद्याप कापूस खरेदी केंद्र सुरू केली नाहीत. त्याचा फायदा घेत खासगी व्यापारी गावाबाहेर मोठे काटे घेऊन शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करत आहेत.

सध्या पाच ते साडेपाच हजार रूपये क्विंटल भावाने कापूस खरेदी सुरू आहे. शेतकऱ्यांना हा भाव परवडत नसतानाही केवळ पैसा मोकळा करून इतर दैनंदिन गरजेसाठी शेतकरी कापूस विकत आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकरी नागवला जातो. कोणत्याही व्यापाऱ्याकडे धरम काटा नाही. काटा मारणे या पारंपरिक फसवणुकीच्या प्रकाराला शेतकऱ्याला तोंड द्यावे लागते. परंतु पर्याय नसल्याने शेतकरी कापूस विकत आहेत.


दुष्काळी पार्श्वभूमीवर कापूस चोरी करणाऱ्या टोळ्या तालुक्यात कार्यरत झाल्या आहेत. अंधारात कापूस चमकतो व रात्री कामही जोरात उरकत असल्याने जास्त प्रमाणात कापूस चोरला जात आहे. शेतकऱ्यांनी रात्री शेताकडे फिरकू नये, यासाठी या चोरांकडूनच बिबट्या आल्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याची चर्चाही शेतकऱ्यांमध्ये आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------

Loading...
Powered by Blogger.