हिंदू राष्ट्र सेना नगर मनपा निवडणुकीच्या रिंगणात.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच 'ड'मधून चंद्रकला दिगंबर गेंट्याल यांच्या माध्यमातून हिंदू राष्ट्र सेनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. विशेष म्हणजे, सर्वसाधारण असलेल्या या जागेमधून एकमेव महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. 
Loading...

ऐनवेळी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेल्या हिंदू राष्ट्र सेनेने प्रभाग क्रमांक ५ मधून सर्वसाधारण महिला राखीव (क) व सर्वसाधारण (ड) प्रभागांमधून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी २.४५ च्या सुमारास निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. 

त्यातील प्रभाग ५ क मधील गौतमी दिगंबर गेंट्याल यांचा उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी रविवारी दुपारी मागे घेतला. प्रभाग क्रमांक 'ड' मधील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अनेकांनी गेंट्याल यांच्याशी संपर्क साधला होता. परंतु, प्रस्थापितांविरुद्ध लढण्याचा निर्णय घेत राखीव जागेतून संधी असतानाही सर्वसाधारण खुल्या प्रवर्गामधील उमेदवारी अर्ज कायम ठेवला. 

येथे चंद्रकला गेंट्याल या एकमेव महिला उमेदवार आहेत. या प्रभागामधून भाजपचे महेंद्र गंधे, शिवसेनेचे पराग गुंड, काँग्रेसचे योगेश सोनवणे यांच्यासह मनसेचे विशाल शितोळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.