मातीमिश्रित वाळूचा धंदा तेजीत.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील आरडगाव परिसरातून शेतातील मातीमिश्रित वाळूचा जोरदार उपसा होत असून महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे राहुरी-आरडगाव रस्त्यावर अनेक ठिकाणी सदर मातीमिश्रित वाळूचे डंपर शेतातील विद्युत मोटारीचे पाणी सोडून दुप्पट भावाने विक्री करण्याचे काम सुरू आहे. 


Loading...
राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील मुळा नदी काठावरील राहुरी स्टेशन, तांदुळवाडी, कोंढवड, शिलेगाव, आरडगाव, मानोरी आदी ठिकाणी सातत्याने होणारा बेकायदा वाळूचा उपसा सध्या मानोरी केटीवेअर बंधारा पाण्याने बऱ्यापैकी भरलेला असल्याने जवळजवळ बंद आहे. 

मात्र काही वाळू तस्करांनी शक्कल लढवून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून मातीमिश्रित वाळू असलेल्या शेतकऱ्याच्या शेतातील ठिकाणी शासनाची रॉयल्टी भरून परवानगी घेत या मातीमिश्रित वाळूचा उपसा सुरू केला.


मात्र सदर मातीमिश्रित वाळू भरलेले डंपर रस्त्यावर अनेक ठिकाणी उभे करून शेतातील विद्युत मोटारीने पूर्ण मातीमिश्रित वाळू धुण्याचे उद्योग सुरू असून सदर वाळूला बाजारात जास्त भाव मिळत आहे. शिवाय एक डंपर मातीमिश्रित वाळू धुण्यासाठी साधारणपणे ५०० रुपये मिळत असल्याने शेतकरीही लगेच तयार होतात. 

मातीमिश्रित वाळू वाहतूक करण्यासाठी परवानगी मिळणे शक्य असल्याने पुढील गोष्टीकडे महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. काही ठिकाणी तर महसूल विभागाची कोणतीही परवानगी न घेताच आशा प्रकारे मातीमिश्रीत वाळूचा उपसा होत आहे. सदर वाळूचा जोरदार उपसा व वाहतूक होत असून सर्वसामान्य प्रवासी, शेतकरी व नागरिकांना अडथळा निर्माण होत आहे. 


मातीमिश्रित वाळू उपसा व वाहतूक करण्यासाठी परवानगी देताना कोणत्या कारणासाठी उपसा होणार आहे. याची महसूल विभागाने खात्री करणे गरजेचे आहे. तसेच यापूर्वी झालेल्या सर्व मातीमिश्रीत वाळू ठिकाणाची सविस्तर चौकशी करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.