चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- चार दिवसांपूर्वी पारनेरेच्या राळेगण थेरपाळमधून बेपत्ता झालेल्या दिव्या हनुमंत कारखिले या अकरा वर्षांच्या मुलीचा मृतदेह गावापासून दोन किलोमीटर व हनुमंत कारखिले यांच्या घरापासून पाचशे मीटरवर असलेल्या विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली. 
Loading...

उसाच्या शेताजवळ कारखिले यांचे घर असल्याने दिव्याला बिबट्याने नेले की, तिचे अपहरण झाले याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, सोमवारी सकाळी ११ वाजता शिवाजी कारखिले यांच्या विहिरीत दिव्याचा मृतदेह आढळला. 

आठ दिवसांपूर्वी चार वर्षांच्या एका चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली. त्यानंतर अपहरण झालेली दिव्याचा मृतदेह आढळल्याने गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. सकाळी झालेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांच्या भावना संतप्त होत्या. 

ग्रामसभा सुरु असतानाच दिव्याचा मृतदेह विहिरीत सापडल्याची माहिती एकाने दिल्यानंतर सगळ्यांनी तिकडे धाव घेतली. पारनेरचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी गर्दी पांगवून ग्रामस्थांच्या मदतीने दुपारी मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. एकामागून एक दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत अाहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.