नगर-मनमाड रोडवर अपघातात युवकाचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-मनमाड रोडवर देहरे टोल नाक्याजवळ भरधाव वेगात धावणाऱ्या मोटरसायकलने रस्ता क्रॉस करणाऱ्याा दुचाकीवरील युवकास जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी होवून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 


Loading...
याबाबत माहिती अशी की, आकाश विजय जाधव (वय २२, रा. धामोरी, ता.राहुरी) हा याच्या दुचाकीवरून जात असताना भरधाव वेगात येणाऱ्या एका मोटरसायकलचे नियंत्रण सुटून रस्ता क्रॉस करताना त्याने आकाशच्या दुचाकीस धडक दिली. या धडकेत आकाश गंभीर जखमी झाला.

उपचाराकरता त्याला रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सुनील जाधव यांच्या फिर्यादीवरून अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहा.फौजदार दळवी करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.