दारू पाजण्यास नकार दिल्याने तरुणाला मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  कुकाणा येथील हॉटेलमध्ये जेवण करत असलेल्या तरुणाने दोघा जणांना दारू पाजण्यास नकार दिल्याने त्यास लोखंडी गजाने मारहाण करत खिशातील २० हजार रुपये रोख व मोबाइल असा २५ हजाराचा ऐवज जबरदस्तीने चारून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 


Loading...
याबाबत जब्बार निजाम इनामदार (वय ४१, रा. कुकाणा) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी दि. २४ नोव्हेंबर २०१८ रोजी रात्री ८ वाजता हॉटेल पुष्पक येथे जेवण करत असताना राजू साळुंखे (घिसाडी) व अक्षय गोर्डे (राणकुकाणा) या दोघांनी 'आम्हाला दारू पाज व तुझ्याकडील कापसाचे पैसे काढ' असे धमकावले त्यांना दारू पाजण्यास व पैसे देण्यास नकार दिला असता राजू घिसाडी याने लोखंडी गज डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. 

परंतु, मी मध्ये हात घातल्याने हाताला मार लागला. त्यानंतर दोघांनी मला मारहाण करून राजू व अक्षय यांनी जबरदस्तीने माझे खिशातील कापसाचे वीस हजार रुपये व पाच हजार रुपये किमतीचा मोबाइल घेऊन त्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.