विहिरीतील पाण्याची चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  नेवासा तालुक्यातील देडगाव शिवारात गेल्या एक वर्षापासून विहिरीतून विनापरवाना २५ हजार रुपयांचे पाच लाख लिटर पाणी चोरीस गेल्याची फिर्याद नेवासा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
Loading...

दिनेश हस्तीमल गुगळे (वय ५७, रा. चितळे रोड, अहमदनगर) यांनी यासंदर्भात नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तीत म्हटले आहे, की देडगाव व पाचुंदा शिवारात गुगळे यांची जमीन आहे. त्यांच्या शेतात पाणीपुरवठा करण्यासाठी विहीर, बोअर घेतलेले आहेत. उन्हाळ्यात पाणी कमी पडते, तेंव्हा या विहिरीच्या पाण्याचा वापर करत असतो. 

गुरुवारी (ता. २२) सकाळी दहा वाजता पाचुंदे गावच्या शिवारातील विहिरीवरून पाणी आणण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी विहिरीत इलेक्ट्रीक मोटार टाकून चोरीच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे माझ्या मालकीची वीज वापरून पाणीचोरी होत असल्याचे आढळून आले. परिसरात चौकशी केली असताना गंगाधर कोकरे, पोपट कोकरे व आणखी एक अशा तिघांनी पाण्याची चोरी केली असल्याचे समजले. 

त्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आम्हीच तुझ्या विहिरीचे पाणी वापरतो, तुला काय करायचे ते करून घे, पुन्हा आला, तर तुझे काही खरे नाही, असा दम दिला. त्यांनी एक वर्षात २५ हजार रुपये किंमतीचे पाच लाख लिटर पाणी चोरले आहे. अशी तक्रार नेवासा पोलीस ठाण्यात गुगळे यांनी दिली. यावरू गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.