ऊसतोड मजुरांची टोळी बनविण्याच्या नावाखाली फसवणूक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  ऊसतोड मजुरांची टोळी तयार करून देतो, असे सांगून लाखोंची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुक्यातील ब्राम्हणगाव वेताळ येथील दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Loading...
याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, की वसंत गणपतराव कदम (रा. माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तीत म्हटले आहे, की ब्राम्हणगाव वेताळ येथील रवींद्र बबन गोरे व शांताराम बबन गोरे यांनी संगनमत करून ऊसतोडणी मजुरांची टोळी तयार करून देतो

असे आश्वासन देऊन कदम यांना विश्वासात घेऊन १७ लाख ५० हजार रुपये घेतले; परंतु कारखान्यावर टोळी हजर केली नाही. यावरून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ३६२/१८ नुसार भारतीय दंड विधान कलम ४२०, ३४ प्रमाणे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.