साईकृपा, कुकडी कारखान्यापेक्षा जास्त बाजारभाव 'नागवडे' देणार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  श्रीगोंदे यावर्षी तालुक्यात ऊसक्षेत्र चांगले होते, परंतु हुमणीअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कारखान्यांचे गळीत हंगामही अडचणीत सापडले. मात्र, नागवडे साखर कारखाना सर्व अडचणींवर मात करून साईकृपा आणि कुकडी कारखान्यापेक्षा दोन रुपये जास्त बाजारभाव देईल, अशी ग्वाही नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी रविवारी दिली. 
Loading...

तालुक्यातील म्हातारपिंप्री ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी बोलताना नागवडे म्हणाले, म्हातारपिंप्री ग्रामस्थांनी जलसंधारणाचे मोठे काम केले. कारखाना, जिल्हा परिषद किंवा जिल्हा बँकेशी निगडित कोणत्याही कामात म्हातारपिंप्रीकरांना सर्वतोपरी सहकार्य करू. 


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार राहुल जगताप म्हणाले, विरोधी पक्षाचा आमदार असताना गेल्या चार वर्षांत मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मी मार्गी लावली. कोणतेही काम सांगा, कधीच निधी कमी पडू देणार नाही. म्हातारपिंप्री ग्रामस्थांनी जलसंधारणाचे काम करून विकासाला चालना दिली, असे त्यांनी सांगितले. 


यावेळी प्रतिभा पाचपुते, केशव मगर, सुभाष शिंदे, गट विकास अधिकारी प्रशांत काळे, सरपंच सुभाष तावरे, उपसरपंच लता शिरसाठ, ग्रामसेविका अश्विनी व्यवहारे, विलास वाबळे, बापूसाहेब हिरडे, नितीन वाबळे आदी उपस्थित होते. महेश तावरे यांनी सूत्रसंचालन केले, तर विलास महामुनी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.