न्यायालयाच्या आदेशाने ते पाच उमेदवार पुन्हा रिंगणात उतरणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत सुवेंद्र गांधी, दीप्ती गांधी, सुरेश खरपुडे, प्रदीप परदेशी या भाजपच्या चार उमेदवारांसह शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे व राष्ट्रवादीचे योगेश चिपाडे असे एकून सहा उमेदवारांचे अर्ज निवडणूक अधिकार्‍यांनी बाद ठरविले होते. 

त्यामुळे या सर्व उमेदवारांनी शनिवारी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. आज, सोमवारी दुपारी 1 वाजता या सर्व अर्जांवर सुनावणी होऊन खंडपीठाचे न्यायाधीश जामदार यांनी निवडणुक अधिकार्‍यांना खडसावत भाजपचे सुरेश खरपुडे यांचा अर्ज बाद केला तर अन्य पाच उमेदवारांचे अर्ज वैध ठरविले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पाच उमेदवार पुन्हा रिंगणात उतरले आहेत.Loading...
औरंगाबाद उच्च न्यायालयात भाजपाचे उमेदवार सुवेंद्र गांधी, दीप्ती गांधी व प्रदीप परदेशी, यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरविले आहेत ,यामुळे भाजपासह खा दिलीप गांधी यांनी दिलासा मिळाला असून आता ह्या उमेदवारांना निवडणूक लढवता येणार आहे.मात्र भाजपचेच सुरेश खरपुडे यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे.

दरम्यान न्यायदेवतेवर आमचा विश्वास असून विरोधकांनी कितीही कूट नीतीचे राजकारण केले तरी शेवटी विजय सत्याचाच होतो . आता न्यायालयातील लढाई आहे आता पुढील जिंकली आहे , पुढील काळात जनतेच्या न्यायालयातील लढाई लढून आम्ही ती नक्की जिंकू अशी प्रतिक्रिया भाजप गटनेते सुवेंद्र गांधी यांनी दिली आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या चार उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले होते. त्याचा निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शुक्रवारी पहाटे दिला होता. खा. दिलीप गांधी यांच्या बंगल्याचे अतिक्रमण आडवे आल्याने त्यांचा अर्ज बाद ठरला. त्यामुळे गांधीसह चौघा भाजप उमेदवारांनी त्यांच्या वकिलांमार्फत खंडपीठात याचिका दाखल केली होती.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------Loading...
Powered by Blogger.