मोटारसायकलींच्या अपघातात एक ठार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अकोले तालुक्यातील रंधा धबधब्याजवळील तेरुंगण फाट्यावर कोल्हार-घोटी या राज्य मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये एक जण जागीच ठार झाला. तर दुसऱ्या दुचाकीस्वार जबर जखमी झाला आहे.


Loading...
भाऊसाहेब सुखदेव देठे (वय ३८, रा.मवेशी, ता.अकोले) व त्याची पत्नी रोहिणी भाऊसाहेब देठे (रा.मवेशी.ता.अकोले) हे दोघे गाडी क्रमांक एमएच.०३ एडी.२१६९ या दुचाकीवर बसून राजुरकडून घोटीकडे जात असताना विठ्ठल मंगळा पटेकर (रा.रंधा.ता.अकोले) ही व्यक्ती हिरो होंडा एमएच.१५.एडब्लु.४००७ या दुचाकीवरून रंधा गावाकडून येत होती.

या दोघांची तेेरुंगण फाट्याजवळ समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये भाऊसाहेब सुखदेव देठे यांचा जागेवरच मृत्यू झाला. विठ्ठल मंगळा पटेकर यास जबर मार लागल्याने त्याला पुढील उपचारासाठी राजुर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, पंरतु जास्त मार लागला असल्या कारणाने पुढील उपचारासाठी लोणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

हा अपघात झाल्यानंतर राजुर येथील भास्कर येलमामे यांनी तात्काळ १०८ ला फोन केला. तर राजुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी.वाय. कादरी यांनीही लगेच अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली. आणि अपघातग्रस्तांना उपचारासाठी हलविण्यात आले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.