अंगणवाडी सेविकेची विष घेवून आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अकोले तालुक्यातील अंगणवाडी सेविका योगिता बाळू निसरड यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. १७ तारखेला घडलेल्या या घटनेची नोंद पोलिसांनी उशिरा घेतली आहे. अंगणवाडीची जागा खाली करण्याच्या कारणावरून झालेल्या जाचाला कंटाळून निसरड यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. 


Loading...
निसरड या एका ठिकाणी उघड्यावर अंगणवाडी भरवत होत्या. त्या जागेवरून जागामालक संजय गोडे त्यांना त्रास देत असल्याचा आरोप आहे. या त्रासाला कंटाळून निसरड यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेण्यास टाळाटाळ केली. अंगणवाडी सेविका संघटमेच्या वतीने आवाज उठविल्यानंतर याची नोंद घेण्यात आली. 

यातील आरोपीला अटक करण्याची मागणी संघटनेने केली आहे. संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सत्यभामा तिटमे, इंद्रायणी भांगरे व विमल कानवडे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अकोले पोलिसांनी योगिता यांचे पती बाळू भागवत निसरड यांच्या फिर्यादीवरून गोडे यांच्याविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.