...तर मी तुरूंगातही जाईन.फक्त तुमचे आशीर्वाद राहू द्या - नीलेश लंके.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कृषीगंगा प्रदर्शनाला चार दिवसांत १ लाख ३४ हजार लोकांनी भेट दिली. दोन कोटींची उलाढाल झाली. मी फकीर आहे. मला काहीही घरी न्यायचे नाही. या पुढची लढाई पाण्यासाठी आहे. पाण्यासाठी मी तुरूंगातही जाईन. फक्त तुमचे आशीर्वाद राहू द्या, असे नीलेश लंके यांनी रविवारी प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी बोलताना सांगितले. 
Loading...

नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कृषीगंगा प्रदर्शनाची सांगता संध्याकाळी झाली. शेतकऱ्यांनी चौथ्या दिवशीही मोठी गर्दी केली होती. तालुक्यात दुष्काळ असतानाही बळीराजाने या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शेतीपयोगी औजरांची खरेदी केली. येणाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी नीलेश लंके स्वतः चार दिवस उपस्थित होते.


शेवटच्या दिवशी कुरुंद येथील शेतकरी नामदेव कुंडलीक भोसले यांना किसान कॉर्पेरेशनचे अधिकृत वितरक गोरक्षनाथ लोंढे यांनी फोर्स कंपनीच्या ट्रॅक्टरचे, तसेच सावळेराम पवार (वनकुटे) यांनी घेतलेल्या इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या मोटारसायकलीचे वितरण लंके यांच्या हस्ते करण्यात आले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.