दरोड्याप्रकरणी हिंदुराष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्याला पोलीस कोठडी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हिंदुराष्ट्र सेनेचा कार्यकर्ता परेश चंद्रकांत खराडे रा. दातरंगे मळा, नालेगाव, अहमदनगर याला कोतवाली पोलिसांनी अटक केली. खराडे याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला सोमवार दि.२६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. 


Loading...
गेल्या दोन महिन्यापासून तो फरार होता.. दि.२८ ऑक्टोबर २०१८ रोजी गंजबाजारातील सराफ कारागीर संजीत माणिक मंडल याच्याकडील दहा तोळे सोने चार जणांनी हिसकावून नेले होते. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी सचिन सुभाष वाळके रा.तांगे गल्ली, नालेगाव. कमलेश राजेंद्र नवले रा.कुंभार गल्ली, नालेगाव. अक्षय बाबासाहेब दातरंगे रा. सातपुते तालीम, नालेगाव. या तिघांना पोलिसांनी १ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. 

या गुन्ह्याचा मास्टरमाइंड परेश खराडे हा घटनेनंतर फरार झाला होता. फरारी खराडे हा केडगाव परिसरात आल्याची माहिती कोतवाली पोलिसांना समजली, त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून खराडे याला अटक केली. खराडे याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. 


खराडे याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली असून या गुन्ह्यातील सोने शहरातील एका सोने व्यापाऱ्याला विकल्याची माहिती दिली आहे. यापूर्वी खराडे याच्याविरुद्ध एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली होती. खराडे याच्या तपासकामी कोतवाली पोलिसांनी पथके तैनात केली होती. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.