आमदार जगताप पितापुत्रांसह कर्डिले, राठोड कारवाईतून वगळले


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  महापालिका निवडणूक शांततेत पार पडावी, या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कडक उपाययोजनेचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरातील पोलिस ठाण्यांकडून उपविभागीय दंडाधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या कार्यालयात हद्दपारीचे प्रस्ताव सादर झाले होते. भिंगार कॅम्प पोलिसांकडून १३०, कोतवाली पोलिसांकडून २४७, तर तोफखाना पोलिसांकडून २३७ प्रस्ताव सादर करण्यात आले होते. 
Loading...

संबंधितांना हद्दपार का करु नये, अशा नोटिसा जारी झाल्या होत्या. त्यावर संबंधितांनी समक्ष उपस्थित राहून आपले म्हणणे सादर केले. त्यात आमदार कर्डिले, जगताप, राठोड यांचाही समावेश होता. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारपासून उपविभागीय दंडाधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी अंतिम आदेश जारी करण्यास सुरुवात केली आहे. 

दरम्यान,आमदार संग्राम जगताप,अरुण जगताप, आमदार शिवाजी कर्डिले, माजी.आमदार अनिल राठोड या कारवाईतून वगळण्यात आले. माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक समद खान, शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, सचिन जगताप, सुनील त्र्यंबके आदींना काही अटी- शर्तींच्या आधारावर शहरात वास्तव्य करण्यास परवानगी देण्यात आली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.