खा.दिलीप गांधी समर्थकांमध्ये निराशा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिका निवडणुकीत अर्ज बाद झालेल्यांची व त्यांच्या समर्थकांची अस्वस्थता आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेने औरंगाबाद खंडपीठात कॅव्हेट दाखल करून ठेवले आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज बाद झालेल्यांनी दाखल केलेल्या आव्हान याचिकांवर, शिवसेनेचे म्हणणे ऐकल्याशिवाय अंतिम निर्णय होणार नसल्याचे सांगितले जाते.
Loading...

भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी व त्यांच्या पत्नी दीप्ती गांधी यांचे उमेदवारी अर्ज घराच्या अतिक्रमण मुद्द्यावर बाद झाले आहेत. भाजपचे चार आणि सेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक अर्ज बाद झाल्याने नगरच्या राजकीय विश्वात खळबळ उडाली आहे. 


विशेषतः भाजपचे सुवेंद्र गांधी यांच्या अर्ज बाद होण्याने अनेकविध चर्चा नगरच्या राजकारणात आहेत. महापौरपदाचे भाजपचे ते भावी उमेदवार मानले जात होते. या पार्श्वभूमीवर त्यांचाच अर्ज बाद झाल्याने गांधी समर्थकांमध्ये निराशा पसरली आहे.

गांधी यांच्याविरोधात प्रभाग ११ मधून उभे राहिलेले शिवसेनेचे उमेदवार गिरीश जाधव यांनी निवडणूक छाननीच्या वेळी त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्याचे निश्चित केल्यावर आधी औरंगाबाद खंडपीठात धाव घेऊन कॅव्हेट दाखल करून ठेवले आहे. खासदार गांधींच्या घराचे अतिक्रमण सिद्ध झाले असून, तेथे त्यांचे चिरंजीव सुवेंद्र राहात असल्याने त्यांचा अर्ज बाद केला जावा, असे म्हणणे त्यांनी छाननीच्या वेळी मांडले होते. 

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तीन वेळा सुनावणी घेतली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केले. अखेर गुरुवारी मध्यरात्री गांधी दाम्पत्यासह अन्य चारही उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्याचा निर्णय झाला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.