खोटा धनादेश देणाऱ्याला सहा महिने कैद.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव येथील फौजदारी न्यायालयाने एकास धनादेश अनादर प्रकरणी खोटा चेक देणाऱ्या आरोपीस साडेसहा लाख रुपये नुकसान भरपाईसह सहा महिने कैदेची शिक्षा तसेच एक महिन्याचे आत रक्कम न भरल्यांस पुन्हा एक महिना कैदा अशी शिक्षा कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. एन. देशपांडे यांनी सुनावली. 


Loading...
कोपरगांव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात ऊस पुरवठा करणाऱ्या अमृत संजीवनी कंपनीतर्फे ऊस तोड व वाहतूक करणारे गव्हाळी तांडा (ता. कन्नड जि. औरंगाबाद) येथील आरोपी उत्तम भिवा चव्हाण याने कंपनीकडून उचल रक्कम घेऊन त्याची परतफेड केली नाही. त्यापोटी दिलेला चेक रक्कम अपूर्ण अल्याने वटला नाही, वरील ऊस वहातुक कंपनीतर्फे विजय नरोडे यांनी फिर्याद दाखल केली होती. 

खटल्याची चौकशी होऊन आरोपीस साडेसहा लाख रुपये नुकसान भरपाईसह सहा महिने कैदेची शिक्षा तसेच एक महिन्याचे आत रक्कम न भरल्यास पुन्हा एक महिना कैद अशी शिक्षा सुनावली. ऊस वहातुक कंपनीतर्फे अॅड. अशोक टुपके यांनी काम पाहिले. या निकालामुळे ऊस तोड कंत्राटदारामध्ये खळबळ उडाली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.