श्रीगोंद्यात भाजपा कार्यकर्त्याकडून पोलिसांना मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- एका गुन्ह्याच्या तपासासाठी खासगी वाहनाने चाललेल्या खेड पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाणीची घटना बेलवंडी-शिरूर रस्त्यावर शिंदे वस्तीजवळ घडली. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप जनार्दन येळे यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात 20 जणांविरुद्ध मारहाण व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 


Loading...
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे जिल्ह्यातील खेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप येळे व त्यांचे कर्मचारी एका गुन्ह्याच्या तपासासाठी खासगी वाहनाने चालले असता दुपारी चार वाजेच्या सुमारास शिरूर-बेलवंडी रस्त्यावर बेलवंडीनजीक शिंदे वस्तीजवळ पोलिसांच्या वाहनाला एका हायवा गाडीने कट मारला. 

याबाबत हायवा चालकाला विचारपूस केल्याच्या कारणावरून त्या चालकाने मोठा जमाव गोळा केला. पोलिसांच्या खासगी वाहनाला गाड्या आडव्या लावून लाथाबुक्क्‌यांनी व लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. यावेळी सतीश पोपट धावडे याने व त्याच्या एका साथीदाराने गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न करून आम्ही तुम्हाला इथेच मारणार असा दम दिला. तसेच पोलिसांकडील खासगी वाहनांवर दगड मारून गाडीचे नुकसान केले. याप्रकरणी सतीश पोपट धावडे, सतीश हरिभाऊ धावडे, रवी गावडे, राजेश डफळ, प्रशांत पवार, बाळू धावडे, बाळासाहेब पवार (सर्व रा. येळपणे), मच्छिंद्र चौधरी, अमोल देशमुख, अमोल चौधरी (सर्व रा. पिसोरे), नागेश म्हस्के, सुरेश उंडे, ज्ञानेश्वर रोडकर, अनंत म्हस्के (सर्व रा. येवती), तुषार औटी, प्रवीण अलभर, संदीप अलभर, कैलास अलभर (सर्व रा. देवदैठण) सचिन चाबुकस्वार (रा. शिरूर), अजय भोसले (रा. बेलवंडी) यांच्यासह इतर 25 ते 30 अनोळखी व्यक्तींविरुद्ध मारहाण, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

याप्रकरणी सोळा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना सोमवार (दि.26) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून मुख्य आरोपी सतीश धावडे हा भाजप कार्यकर्ता आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.