धक्कादायक : मुलीची छेड काढणाऱ्या युवकाची तिच्या वडीलांकडून हत्या


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी तालुक्यातील कामतशिंगवे गावात मुलीची छेड काढणाऱ्या युवकाची मुलीच्या वडीलांकडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या गोळीबारात योगेश एकनाथ जाधव(वय-२५) या मृत्यू झाला असून एकनाथ जाधव हे जखमी झाले आहेत. 
Loading...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज दुपारी दीड वाजण्याच्या पोपट गणपत आदमाने याने कामतशिंगवे शिवारात स्वत:च्या रायफलीमधून योगेश एकनाथ जाधव(वय-२५) व एकनाथ जाधव यांच्यावर गोळीबार केला.

यामध्ये योगेश एकनाथ जाधव हा जागीच ठार झाला तर वडील एकनाथ जाधव जखमी झाले. गोळीबार झाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आरोपी पोपट गणपत आदमाने यास अटक केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.