अतिक्रमण व शौचालय नसल्याच्या कारणावरून सरपंचांसह आठ सदस्य अपात्र !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायतीचे काळे गटाचे सरपंच सूर्यभान बबन कोळपे व आठ ग्रामपंचायत सदस्यांना सरकारी जागेवरील अतिक्रमण व शौचालय नसल्याच्या कारणावरून नाशिक विभाग आयुक्त ज्योतिबा पाटील यांनी अपात्र ठरविले आहे, अशी माहिती राजेंद्र निवृत्ती कोळपे यांनी दिली. 


Loading...
या निकालामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यापूर्वीही जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी १० जुलै रोजी आठ ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई केली होती.. याबाबत माहिती अशी, राजेंद्र निवृत्ती कोळपे यांनी अप्पर आयुक्त नाशिक यांच्यासमोर ग्रामपंचायत अपिल क्रमांक ७५/२०१८ दाखल केले होते. 

कोळपेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सूर्यभान बबन कोळपे यांनी सरकारी जागा मिळकत क्रमांक २८० वर १४६२ भोगवटानुक्रमाने परवानगी न घेता गाळा बांधून त्यात अतिक्रमण केलेले आहे. तसेच निवडणूक लढविताना खोटा शौचालयाचा दाखला घेतला होता. 


तर ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर बबन हळनोर, भोला नामदेव बेंडकुळे, शोभा बाबासाहेब थोरात, महेश राजेंद्र कोळपे, सुभद्रा कचरू कोळपे, अलका पाटीलबा धायगुडे, प्रमिला दयाल पारचे हे सरकारी जागेवर अतिक्रमण करून वास्तव्य करीत आहेत. तर दीपाली कैलास कोळपे यांना तीन अपत्ये आहेत. 

याबाबतचे सर्व वस्तुस्थितीजन्य पुरावे राजेंद्र कोळपे यांनी विभागीय आयुक्तांना दिले. . दरम्यान सरपंच सूर्यभान कोळपे यांनी ग्रामसेवकांना हाताशी धरून ग्रामपंचायत इतिवृत्तात खाडाखोड करून स्वत:च्या अधिकारात जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त पातळीवर अपात्र प्रकरणात आपल्याला फायदा होईल, असे कृत्य केले. हेदेखील राजेंद्र कोळपे यांनी विभागीय आयुक्तांना पटवून दिले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.