महावितरणच्या अभियंत्यास जीवे मारण्याची धमकी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता विश्वजीत विलासराव मोडक हे नायकवाडपुरा येथील समाद शेख याने विज बिल न भरल्याने त्याचे लाईट कनेक्शन कट करण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत गेले असता यावेळी शेख याने त्यांना जीवे मारण्याची धमकी देत सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना शुक्रवार दि.२३ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. 

Loading...
याप्रकरणी समाद शेख याच्याविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विश्वजीत मोडक हे संगमनेर महावितरण कंपनीमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. नायकवाडपुरा याठिकाणी राहणारा समाद शेख याचे विज बिल थकले होते. म्हणून शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मोडक व त्यांच्यासोबत कर्मचारी योगेश दोडे हे दोघे थकलेले विज बिल भरण्याबाबत त्यास सांगण्यास गेले असता त्यावेळी त्याने विज बिल भरण्यास नकार दिला.

मोडक यांनी विज कर्मचारी दोडे यांना सदरचे विज कनेक्शन कट करण्याचा आदेश दिला. त्यानंतर दोडे हे पोलवर चढले असता समाद शेख याने मोडक व दोडे यांना अर्वाच्च्य भाषेत शिविगाळ करुन त्यांची गाडी अडवत तुम्ही विजेचे कनेक्शन कट करुन दाखवाच, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली व सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.