डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली भरीव विकासकामे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे राज्याच्या व शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाबाबत दूरदृष्टीचे धोरण बाळगून आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघात असणारे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र शिर्डी शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी डॉ. सुजय विखे यांच्यावर आहे. राधाकृष्ण विखे गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. 

Loading...
मात्र, प्रयत्न करूनही शिर्डी शहराच्या १०० टक्के मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नव्हत्या. परंतु मला विरोधी पक्षनेते विखे यांनी शिर्डीच्या नगराध्यक्षपदाची संधी दिली. त्याला डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाची जोड, त्यांचे धाडसी नेतृत्व व निर्णयक्षमता त्यामुळे मला माझ्या पावणेदोन वर्षांच्या कार्यकाळात भरीव व यापूर्वी कधीही झाली नाही एवढी विकासकामे करता आली, असे अभिमानाने शिर्डीनगरीच्या नगराध्यक्षा योगिता अभय शेळके यांनी सांगितले. 

आपल्या पावणेदोन वर्षांच्या कार्यकाळास उजाळा देताना त्यांना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना शिर्डी शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे डॉ. सुजय विखे यांचे ध्येय असल्याचे सांगितले. शिर्डी शहरातील अंतर्गत सीमेला व शहराला जोडणारे २२ कोटी रुपये खर्चाचे रस्ते नगरोत्थान योजने अंतर्गत निधीतून पूर्ण झाले आहेत. 

शिर्डी शहरातील वॉर्डातील अंतर्गत ड्रेनेजलाइन, स्ट्रीटलाईट, काँक्रीट, तसेच पेव्हर ब्लॉकचे रस्ते असे एकूण ११ कोटी रुपयांची विकासकामे नगरपालिका फंडातून पूर्ण झाली आहेत. डीपी प्लॅनमधील ६ रस्त्यांच्या भूसंपादनासाठी साईबाबा संस्थानकडून २८७ कोटी रुपये मंजूर करून हा प्रस्ताव येत्या काही दिवसांत राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर आहे. या रस्त्यांच्या कामासाठी साईबाबा संस्थान पुढील निधी देणार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.