दूध ५ रुपयांनी महागण्याची शक्यता


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दूध दरातील घसरणीमुळे आंदोलन केल्यानंतर उत्पादकांना ५ रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याचा निर्णय घेऊनही ५0 दिवसांत प्रत्यक्ष ती रक्कम न दिल्याने या अनुदान योजनेतून बाहेर पडण्याचा इशाराचा दूध उत्पादकांनी दिला आहे. त्यामुळे दुधाचे दर एका लिटरमागे पाच रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. 

Loading...
अनुदान थकल्यामुळे उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची बैठक नुकतीच झाली. यात ५८ सहकारी आणि खासगी डेअरीचे ७६ प्रतिनिधी उपस्थित होते. उत्पादकांना दर कमी मिळत असल्याने अनुदान देण्याचा निर्णय जुलैमध्ये राज्य सरकारने घेतला होता. आॅगस्ट महिन्याची रक्कम उत्पादकांना दिली. त्यानंतर आतापर्यंतची रक्कम मिळालेली नाही. 

सरकारने १५ डिसेंबरपर्यंत अनुदान न दिल्यास त्या योजनेतून बाहेर पडण्याचा इशारा दूध संघाच्या प्रतिनिधींनी दिला. त्यामुळे दुधाचे दर वाढवणार की नाही यावर बोलण्यास नकार दिला. मात्र अनुदान योजनेतून बाहेर पडल्यास दुधाचा दर वाढविण्याशिवाय व्यावसायिकांकडे पर्याय नसल्याचे सांगण्यात येते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.