महापालिका निवडणुकीतील बाद उमेदवारांची न्यायालयाकडे धाव.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  महापालिका निवडणुकीतील छाननी ही पूर्व तालीम ठरली. खासदार दिलीप गांधी यांचे पूत्र सुवेंद्र, स्नुषा दिप्ती यांच्यासह शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे, राष्ट्रवादीचे डॉ. योगेश चिपाडे यांचे अर्ज बाद झाले. 
Loading...

भारतीय जनता पक्षाचे एकूण चार उमेदवारांचे अर्ज बाद झाले. भाजपला हा मोठा धक्का आहे. यातून सावरण्यासाठी भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी न्यायालयाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे धाव घेतली आहे. 


निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाविरोधात अपील दाखल करण्याची तयारी या बाद उमेदवारांनी सुरू केली आहे. चौथा शनिवारी आणि रविवार हे सुटीचे दिवस आले आहेत. त्यामुळे अपील दाखल होईल की नाही ही शंकाच व्यक्त होत आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.